घशाचे आरोग्य जपा

 

घशाचे आरोग्य  आणि आवाजातील बदल

बदल जीवनाच्या प्राकृतिक भाग आहे, आणि आपल्या  आवाजात वेळोवेळी बदल होऊ शकतात.

त्याच कारणं खालील प्रमाणे असू शकतात

 

१) वयोमानानुसार होणारे आवाजातील बदल

२) अयोग्य पद्धतीने बोलण्याच्या सवयी

३) आजारपणामुळे

 

 ह्या कारणांचा आपण एक एक करून अभ्यास करूया

 

1. वयोमान आणि आवाजात होणारा बदल:

आपल्याला वय वाढतांना आपल्या आवाजात काही नैसर्गिक बदल होऊ शकतात. या बदलांमध्ये, आपल्या आवाजाची ठेवण गुणस्तर यामध्ये  बदल होऊ शकतात जसे कि आवाजात कंप निर्माण होणे.त्यामुळे जर आपण आवाजाची व्यवस्थित काळजी घेतली   आवाजाची काळजी घेणे  जसे कि त्यामध्ये  मोठ्या  आवाजात  न बोलणे  योग्य प्रमाणात पाणी पिणे जास्त ह्या गोष्टीचा समावेश होतो  आवाजच्या काही व्यायामाने सुद्धा वयोमानानुसार होणारे आवाजाचे बदल कमी करू शकतो .

 

2.आजार आणि वैद्यकीय स्थिती:

विविध वैद्यकीय स्थिती मूळे आपल्या आवाजात तात्पुरत्या स्वरूपाचे किंवा कायम स्वरूपाचे बदल होऊ शकतात.घश्याचे निरनिराळे आजार ,जास्त ऍसिडिटी मूळे होणारे  घशाचे आजार किंवा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्यामुळे होणारे आजार किंवा ज्या  व्यक्ती आवाजाचा  जास्त वापर करतात जसेकी,शिक्षक, गायक,दुकानदार,यांना आवाजाच्या अत्याधिक वापरामुळे ( professional Voice abuse )  आवाजात बदल होऊ शकतात. अश्यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने यावर उपाय आणि उपचार करता येतात.

 

3. जीवनशैली व व्यसन:

वाईट सवयी जसे  की  बिडी किंवा सिगारेट चे सेवन अत्याधिक प्रमाणात जे लोक करतात त्यांच्यामध्ये स्वरयंत्राच्या तंतूंना इजा पोहचून आवाजात घोगरेपणा अथवा खरखर निर्नाम होऊ शकते आणि नंतर त्याचेच रूपांतर कर्करोगात होऊ शकते.सामान्यतः जनमानसात एक असा समज दिसून येतो कि आमच्या ओळखीतली ती व्यक्ती तर मागच्या तीस पस्तीस वर्षांपासून तंबाखूचे  सेवन करतात पण त्यांना काहीच झाले नाही मग मला कश्याला काय होईल, हा एक निव्वळ गैरसमज आहे कारण आपण किती दिवस आणि किती प्रमाणात याचे सेवन करतो हे जसे महत्वाचे आहे तसेच आपले शरीर त्याला कसा प्रतिसात देते हे पण तेवढेच महत्वाचे असते कारण असे पण रुग्ण आढळून येतात जे सांगतात की मी फक्त दोन-तीन वर्षांपूर्वीच तर व्यसन सुरु केले होते, तरी सुद्धा त्यांच्यात कर्करोग आढळून आलेला आहे त्यामुळे तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहणेच आपल्या स्वास्थ्यासाठी चांगले असते.

४) पर्यावरणातील घटक :

पर्यावरणातील हानीकारक घटक जसे निरनिराळे प्रदूषण , हवेतील कोरडेपणा यांचा सुद्धा आपल्या आवाजावर  विपरीत परिणाम  होत असतो त्यामुळे अश्या प्रदूषणांपासून स्वतःला वाचवणे व जर हवेत शुष्कपणा जास्त असेल तर वेळोवेळी पाण्याचे  योग्य प्रमाणात सेवन  करणे  व शुष्क वातावरणात हुमीडीफार चा उपयोग करून आपण आपल्या आवाजाची काळजी घेऊ शकतो.

५) औषधींचा वापर:

काही विशिष्ट प्रकारच्या औषधींमुळे सुद्धा आपल्या आवाजावर विपरीत परिणाम होऊन आवाज बदलू शकतो त्यामुळे जर का एखादी नवीन औषधी आपण सुरु केली असेल व त्यामुळे जर आपल्या आवाजात बदल झाला असेल तर त्वरित तज्ञ् डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

६) ऍलर्जी व श्वसनाचे आजार:

ऍलर्जी,अस्थमा किंवा COPD यासारख्या  आजारांळे स्वरयंत्रावर सूज येणे व आपल्या श्वसन नलिकेत सूज येणे यामुळे आपला आवाज बदलू शकतो त्यामुळे असे आजार असलेल्या लोकांनी दिलेल्या औषधी व्यवस्थित घेऊन आपल्या प्रकृतीची व आवाजाची योग्य काळजी घेऊ शकतात. 



 डॉ महेंद्र कटरे

कान , नाक ,घसा व हेड नेक कॅन्सर सर्जन 

एस कान , नाक ,घसा हॉस्पिटल 

पुंडलिक नगर रोड ,न्यारा पेट्रोल पंप जवळ गारखेडा 

छ.संभाजीनगर (औरंगाबाद )

9657044735

 

Comments