घशाचे आरोग्य जपा
घशाचे आरोग्य आणि आवाजातील बदल बदल जीवनाच्या प्राकृतिक भाग आहे, आणि आपल्या आवाजात वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्याच कारणं खालील प्रमाणे असू शकतात १) वयोमानानुसार होणारे आवाजातील बदल २) अयोग्य पद्धतीने बोलण्याच्या सवयी ३) आजारपणामुळे ह्या कारणांचा आपण एक एक करून अभ्यास करूया 1. वयोमान आणि आवाजात होणारा बदल: आपल्याला वय वाढतांना आपल्या आवाजात काही नैसर्गिक बदल होऊ शकतात. या बदलांमध्ये, आपल्या आवाजाची ठेवण गुणस्तर यामध्ये बदल होऊ शकतात जसे कि आवाजात कंप निर्माण होणे.त्यामुळे जर आपण आवाजाची व्यवस्थित काळजी घेतली आवाजाची काळजी घेणे जसे कि त्यामध्ये मोठ्या आवाजात न बोलणे योग्य प्रमाणात पाणी पिणे जास्त ह्या गोष्टीचा समावेश होतो आवाजच्या काही व्यायामाने सुद्धा वयोमानानुसार होणारे आवाजाचे बदल कमी करू शकतो . 2.आजार आणि वैद्यकीय स्थिती: विविध वैद्यकीय स्थिती मूळे आपल्या आवाजात तात्पुरत्या स्वरूपाचे किंवा कायम स्वरूपाचे बदल होऊ शकतात.घश्याचे निरनिर...